मुलांना आपल्यापासून दूर ठेवत असल्याच्या रागातून पापी पतीने पत्नीचा खून करून मृतदेह पुरल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील तडलगी गावात उघडकीस आली आहे.
३६ वर्षीय द्राक्षायणी राचय्या बन्नीगोळमठ या महिलेच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. तिचा पती राचय्या याने पत्नी आपल्याला मुलांपासून दूर ठेवत असल्याच्या रागातून तिचा खून करून मृतदेह जमिनीखाली पुरला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुरलेला मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबत कोल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Recent Comments