Belagavi

मनपा निवडणुकीवरून आझमनगरात राडा; दोघे जखमी 

Share

निवडणूक आणि राडा हे समीकरणच रूढ झाले आहे. बेळगाव पालिकेच्या यावेळच्या निवडणुकीत पहिला राडा रविवारी सकाळी आझमनगरात झाला असून यात दोघेजण जखमी झाले आहेत.

रविवारी सकाळी आझमनगरात राष्ट्रीय पक्षाच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयावर अचानक हल्ला चढवून राडा केला असून यात दोघेजण जखमी झाले आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार फतेखान यांच्या कार्यालयावर हल्ला चढवून परशुराम पाटील व सलमान नामक दोघं कार्यकर्त्यांना जखमी केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींना उपचारासाठी जिल्हा इस्पितळात पाठवून दिले आहे.

 

Tags: