येत्या ३ सप्टेंबरला होणारी बेळगाव पालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बेळगाव पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. माळमारुती पोलिसांनी रविवारी रौडी परेड घेऊन, निवडणूक काळात कुरबुरी केल्या तर कठोर कारवाई करू असा कडक इशारा राऊडीशीटर्सना दिला.
मार्केट उपविभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी टिळकवाडी पोलीस ठाण्यात रौडी परेड घेण्यात आली. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून मनपा निवडणूक व गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था याना बाधा पोहोचेल असे वर्तन न करण्याची सूचना राऊडीशीटर्सना देण्यात आली. मतदान शांततेत पार पडण्यास सहकार्य करा, काही कुरबुरी केल्यास मुळीच गय केली जाणार नाही असा इशारा एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी यावेळी राऊडीशीटर्सना दिला. यावेळी माळमारुती आणि अन्य पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Recent Comments