महाराष्ट्र एकीकरण समितीचे किमान १० तर नगरसेवक आधी निवडून येत. परंतु म. ए. समितीने एआयएमसोबत युती रन एम प्लस एम धोरण अवलंबल्याने त्यांचे १० नगरसेवकही निवडून येणार नाहीत असा दावा दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केला.
बेळगावातील धर्मनाथ भवनात शनिवारी मनपा निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. एमईएस आणि एआयएम युतीबाबत आम्ही तक्रार करण्याची गरजच नाही. लोकच त्यांना चांगला धडा शिकवतील. त्यांच्या १० जागाही निवडून येणार नाहीत. निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. ४५हुन अधिक जागा निवडून आल्यास आम्ही शहराचा विकास कशाप्रकारे करू याबाबत आज भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला.
मनपा निवडणूक प्रचारासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री शशिकला जोल्ले, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, त्याचप्रमाणे पक्षाचे आजी-माजी आमदार, बेंगळूरहून सतीश रेड्डी, बेंगळूर मनपाचे १५ नगरसेवक आले आहेत. २९ ऑगस्टला मंत्री गोविंद कारजोळ, परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू येणार आहेत. ३० व ३१ रोजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा, ३१ रोजी मंत्री मुरुगेश निराणी, १ सप्टेंबरला मंत्री भैरत्ती बसवराज, शिक्षणमंत्री बी. सी. नागेश, इंधनमंत्री सुनीलकुमार याना येण्याची विनंती केली आहे. बेळगावच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही निवडणूक ठरेल असा विश्वासही आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला.
Recent Comments