Belagavi

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उडवली एम प्लस एमची खिल्ली

Share

 बेळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात सध्या व्हाट्स ऍपवर एम प्लस एम असे वृत्त फिरत आहे. याबाबत मी . अनिल बेनके याना विचारले असता, एम प्लस एम म्हणजेसमोरासमोर उभे राहून मारामारी करणेअसे उत्तर दिले असे सांगत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी . . समितीने मुस्लिम उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्याची खाल्ली उडवली.

बेळगाव मनपा निवडणुकीचा भाजपचा  प्रकाशित  धर्मनाथ भवनातील कार्यक्रमात बोलताना विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी म्हणाले, विकास आणि हिंदुत्व या मुद्यावरच भाजप निवडणूक लढवत आला आहे. एम प्लस एमबाबत प्रत्येक मतदारांत जागृती करणे हे आमचे कर्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही स्वाभिमानाने जगलो आहोत. बेळगावचे लोक शहाणे, दूरदृष्टीचे आहेत. त्यांनी सर्व पार्श्वभूमी तपासून भाजपला मतदान करावे असे आवाहन सवदी यांनी केले.

यावेळी मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, बेळगावात अनेकवेळा मनपा निवडणूक, अनेक महापौर झाले. पण येथे विकास झालेला नाही. यावेळी आमचाच महापौर, उपमहापौर होईल हे नक्की. विकासाला प्राधान्य देणाऱ्या चांगल्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. राज्यात आणि केंद्रात आमचेच सरकार असल्याने बेळगावंही आमच्याच ताब्यात येईल. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा बेळगावच्या जनतेने चांगल्याप्रकारे स्वागत केले आहे.

याप्रसंगी विधानसभा उपसभापती आनंद मामनी, आ. सतीश रेड्डी, अभय पाटील, अनिल बेनके, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र नेर्ली, राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.

 

Tags: