Belagavi

बेळगाव मनपा काँग्रेसला देऊन तर पहा… आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले गुपित !

Share

बेळगाव मनपा एकदा काँग्रेसच्या ताब्यात देऊन तर पहा, आम्ही कसा शहराचा विकास साधतो असे म्हणत . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेसची विकासाची भूमिका स्पष्ट केली.

शनिवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच आमची प्रबळ प्रतिस्पर्धी नाही तर दुबळा उमेदवारही प्रतिस्पर्धी आहे असे आम्ही मानतो. कोणी भाषेचे राजकारण करो व कोणी जातीचे, काँग्रेस मात्र विकासाच्या मुद्द्यांवरच राजकारण करेल असा टोला त्यांनी म. ए. समिती आणि भाजपला लगावला. बेळगाव महानगर पालिका एकदा काँग्रेसच्या ताब्यात देऊन तर पहा, कसा विकास करायचा असतो हे दाखवून देऊ असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. आजवर म. ए. समितीने अनेकांना महापौर केले. यावेळी काँग्रेस उमेदवारांना मतदान करा, आमचा महापौर करा असे आवाहन त्यांनी केले.

बेळगाव मनपा निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातच्या महिला खासदार आल्या आहेत. आणखी एक खासदार येणार आहेत असे सांगून, लोकांना बदल दिसला पाहिजे. बेळगावचे मतदार सुज्ञ व शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांची कोणी फसवणूक करू शकत नाही असा विश्वास आ. हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

एकंदर, बेळगाव मनपावर एकदा संधी द्या, कसा विकास करून दाखवतो हे बघा असा भरवसा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी मतदारांना दिला.

 

 

 

Tags: