मराठी भाषिकांच्या मतांवर सत्तेवर येऊन मराठी भाषिकांची दिशाभूल केली आहे. सत्तेसाठी राजकारण केले आहे. काँग्रेसशी हात मिळवणी करून केवळ सत्ता उपभोगली आहे. मात्र मराठी भाषिकांशी गद्दारी केली आहे. किरण सायनाक यांनी कोणता विकास केला? असा सवाल वार्ड नंबर 43 मधील मतदारातून उपस्थित केला जात आहे.
भाषा व द्वेषाचे राजकारण करून नेहमीच सत्ता उपभोगली आहे. मात्र विकासा पासून मतदारांना दूर ठेवण्यात आले आहे. यासाठी मतदारांनी आता विकासाच्या बाजूने राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नेहमीच विकासाला प्रोत्साहन देऊन मतदार संघात अनेक विकास कामे राबवली आहेत. भाषेचे राजकारण न करता विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार वाणी विलास जोशी यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मराठी भाषिकांची दिशाभूल करून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांना दूर ठेवण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त करून वाणी जोशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचा निर्धार केला आहे. मतदारातून किरण सायनाक यांच्या कामगिरीबद्दल सवाल उपस्थित केला जात आहे. पावसामुळे नागरिकांच्या घराघरात पाणी शिरले असताना कोणी मदत केली याची आपल्याला चांगली जाणीव आहे. अशी प्रतिक्रिया मतदारातून व्यक्त केली जात आहे .त्यामुळे मतदारसंघात भाजप उमेदवार वाणी जोशी यांना उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे.
Recent Comments