Belagavi

‘आपली मराठी’चा इम्पॅक्ट : अगसगेत रस्ताकाम प्रारंभ !

Share

बेळगाव तालुक्यातील अगसगे गावात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत इन न्यूजच्याआपली मराठीने प्रसारित केलेल्या वृत्ताचा सकारात्मक परिणाम झाला असून रस्ताकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीआपली मराठीचे आभार मानले आहेत.

२ महिन्यांपूर्वी अगसगे गावातील आंबेडकर रस्त्याचे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेच्या पाईपलाईन घालण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याची दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ‘आपली मराठी’ने नुकतेच सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेऊन आंबेडकर गल्लीत आजपासून रस्ता दुरुस्ती कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.  वृत्त प्रसारित करून लोकांची समस्या सोडवल्याबद्दल दलित प्रगतीपर सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मेत्री, यल्लाप्पा मेत्री, भुजंग कोलकर यांच्यासह आंबेडकर गल्ली रहिवाशांनी आभार मानले आहेत.

 

Tags: