Belagavi

संघाचे नाव उताऱ्यावर पुन्हा नोंदविण्याची मागणी

Share

 चिकोडी तालुक्यातील जैनापूर गावातील सर्व्हे नं. ५४(बी) मधील जमिनीच्या उताऱ्यावरील सिद्धार्थ हरिजन सामूहिक शेती सहकारी संघाचे नाव कमी केल्याच्या निषेधार्थ संघाच्या भागधारकांनी बुधवारी बेळगावात निदर्शने केली.  बुधवारी बेळगावातील आंबेडकर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून संघाच्या सदस्यांनी मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या.

१९७२मध्ये तत्कालीन राज्यपाल धर्मवीर हे चिक्कोडी दौऱ्यावर आले असता, दलित नेत्यांनी, आम्हाला कसण्यासाठी जमीन नाही. त्यामुळे आम्हाला जमीन द्या अशी विनंती केली होती. त्यावर राज्यपाल धर्मवीर यांनी लगेचच जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून जैनापूर गावातील सर्व्हे नं. ५४(बी) मधील जमिन मंजूर करून दिली होती. गेल्या ४९ वर्षांपासून सिद्धार्थ हरिजन सामूहिक शेती सहकारी संघाच्या नावाखाली ६६ दलित ही जमीन कसत आहेत. असे असताना २००४मध्ये अचानक संघाचे उताऱ्यावरील नाव कमी करण्यात आले आहे. त्यामुळे दलितांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे त्वरित संघाचे नाव पुन्हा उताऱ्यावर नोंद करावे अशी मागणी निदर्शकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली  ,यासंदर्भात एका दलित नेत्याने, १५ दिवसांत उताऱ्यावर संघाचे नाव पूर्ववत नोंदवावे. अन्यथा बेळगावातील विविध दलित संघटनांच्या मदतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

निदर्शनात इराप्पा संतागोळ, राजू गौरागोळ, भीमाप्पा तळीकेरी, अशोक निंगनूर, धुंडाप्पा संतागोळ आदी उपस्थित होते.

 

 

Tags: