विजापूर शहरात सार्वजनिक गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करू इच्छिणाऱ्या मंडळांना वैयक्तिक देणगी देण्याची घोषणा आ. बसवराज पाटील–यत्नाळ यांनी केली आहे.
आपल्या आप्त सचिवांमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. यत्नाळ यांनी ही माहिती देऊन म्हटले आहे की, मातीपासून बनवलेल्या सार्वजनिक श्रीमूर्तींसाठी ५ हजार तर अन्य श्रीमूर्तींसाठी २,५०० हजार रुपये देण्यात येतील. श्री सिद्धेश्वर संस्थेत उभारलेल्या कक्षात मंडळांनी यासाठी अर्ज देऊन देणगी प्राप्त करावी. त्याचप्रमाणे याठिकाणी मंडळांना पोलीस परवानगी, हेस्कॉमकडून वीजपुरवठा परवानगीसह अन्य परवानग्या उपलब्ध करून देण्यात येतील. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणीही विचलित होऊ नये. शांततापूर्ण मार्गाने, सामाजिक अंतर पाळून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आ. यत्नाळ यांनी केले आहे.
Recent Comments