Chikkodi

नागरमुन्नोळी जि. पं. मतदारसंघात ३.४० कोटींची रस्ताकामे 

Share

 नागरमुन्नोळी जि. पं. मतदारसंघात विविध गावात एकूण .४० कोटी रुपये निधीतून रस्ते निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे अशी माहिती भाजप नेते पवन कत्ती यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी जि. पं. मतदारसंघातील विविध गावातील रस्तेकामांचा भूमिपूजन करून प्रारंभ केल्यावर ते बोलत होते. तालुक्यातील जागनूर गावापासून ते हनुमंत खिंडी यांच्या शेतावरून करेम्मादेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाख रु., मिरापुरहळ्ळी गावातील कोलार शेतापासून महानंदी शेतांपर्यंतच्या रस्त्याच्या विकासासाठी ३० लाख रु., नागरमुन्नोळी गावातील बेळगली क्रॉस ते पुंडलिक कांबळे यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्यासाठी ८० लाख रु., बेळगली कलमड अंगणवाडीपासून किवडनावर यांच्या शेतांपर्यंतच्या रस्त्यासाठी ७० लाख रु., बेळकूड-नागरमुन्नोळी आडमार्गपासून बसवनगरपर्यंतच्या रस्त्याच्या विकासासाठी ४० लाख रु., इटनाळ गावातील जोडकुरली रस्त्यापासून टोनपे कॉलनीपर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाख रु., उमराणी गावच्या लक्ष्मी मंदिरापासून दुन्ड्य्या मठपती यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यासाठो ४० लाख रु. अनुदान मंजूर झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे रस्ते बांधण्यात येत आहेत.ग्रामस्थांनी यावर देखरेख ठेवून उत्तम दर्जाचे रस्ते बनवून घ्यावेत. अधिकारी आणि कंत्राटदाराने दक्षता घेऊन हे रस्ते चांगल्या दर्जाचे बनतील याची काळजी घ्यावी अधिसूचना पवन कत्ती यांनी यावेळी केली.

यावेळी संकेश्वरच्या हिरा शुगर्सचे संचालक सुरेश बेल्लद, स्थानिक नेते गुलाब जमादार, तिम्मण्णा गाडीवड्डर, लाडजी मुलतानी, मुरिगेप्पा आदिसेरी, डॉ. अरुण रायी, रामण्णा हलटी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: