कामांचा दर्जा चांगला राखून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची अमलबजावणी जिल्ह्यात करावी अशी सूचना खा. मंगल अंगडी यांनी अधिकाऱ्यांना केली.
बुधवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये जिल्हा विकास आणि देखरेख समिती अर्थात दिशा समितीची २०२१-२२ च्या दुसरी त्रैमासिक बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. मंगल अंगडी होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद आणि समन्वय निश्चित करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या योजनांची चांगली अमलबजावणी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी दिशा समितीची रचना केली आहे असे त्यांनी सांगितले. कामांचा दर्जा चांगला राखून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची अमलबजावणी जिल्ह्यात करण्याबाबत त्यांनी यावेळी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, राजू देसाई, दोड्डलिंगन्नावर, शांताप्पा अरुटगी, दिशा समितीचे सदस्य, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Recent Comments