मनपा निवडणूक सेक्टर अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून देण्यात येत असलेले निवडणूक प्रशिक्षण घेऊन निवडणूक यशस्वी करण्याचे आवाहन प्रशिक्षणाधिकारी शिरगावकर यांनी केले.
होय, बेळगाव महानगरपालिकेच्या ५८ प्रभागांसाठी येत्या ३ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक सेक्टर अधिकाऱ्यांसाठी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात मंगळवारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना प्रशिक्षणाधिकारी शिरगावकर यांनी, सेक्टर अधिकाऱ्यांनी निवडणूक ड्युटीला हजर होण्यापासून ते मतदान यंत्रे, उपकरणे ताब्यात घेऊन मतदान केंद्रावर हजर होऊन, दुसऱ्या दिवशी मतदान सुरु होण्यापूर्वी सकाळी ७च्या आत सर्व तयारी पूर्ण करून मतदान घेऊन, ते पूर्ण झाल्यावर सर्व मतदान यंत्रे, उपकरणे सील करून मतदानाची आकडेवारी निश्चित करून सर्व मतदान यंत्रे व उपकरणे मतमोजणी केंद्रावर आणेपर्यंत कसे काम केले पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे आदींबाबत तपशीलवार माहिती दिली. प्रशिक्षणाला वेळेवर उपस्थित रहावे, प्रशिक्षण केंद्रातील सुविधा, यंत्रोपकरणांची जुळवाजुळव करून किमान ९० टक्के कर्मचारी आल्यावरच प्रशिक्षणाला प्रारंभ करावा. त्यानंतर एकमेकांचा परिचय करून घ्यावा, प्रशिक्षणावेळी कर्मचाऱ्यांना सध्या-सोप्या भाषेत माहिती द्यावी, कोणावर राग करू नये अशा अनेक सूचना शिरगावकर यांनी दिल्या. यावेळी मनपा निवडणूक सेक्टर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Recent Comments