Belagavi

दिल्लीच्या धर्तीवर बेळगावचा विकास करू : आपची भूमिका

Share

दिल्लीच्या धर्तीवर बेळगावचा विकास करू असे अभिवचन आम आदमी पार्टीने बेळगाववासियांना दिले आहे. मंगळवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत आप नेत्यांनी पक्षाची भूमिका मांडली

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक यावेळी जरा जास्तच रंगतदार ठरू लागली आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएस अशा राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने चुरस होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच काँग्रेस-भाजप या दोन पक्षांच्या लढाईत आपली नौका पार करण्याचा निर्धार आपने केला आहे. यंदा बेळगाव महानगरपालिकेच्या ५८ प्रभागांपैकी २८ प्रभागात आम आदमी पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मंगळवारी पक्षाच्या नेत्यांनी मनपा निवडणुकीचा आपचा जाहीरनामा जारी केला. २० हजार लिटरपर्यंत मोफत पाणी देऊ, गरीब विध्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देऊ असे आमिष दाखविण्याबरोबरच दर्जेदार रस्ते, अखंड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यासह अनेक अन्य आश्वासनही आपने दिली आहेत. आपच्या सत्तेत देशाची राजधानी दिल्लीचा जसा सर्वांगीण विकास झाला तसा विकास बेळगावचाही करू असे आपचे नेते लक्ष्मीकांत राव यांनी पत्रकारांना सांगितले.

एकंदर, भाजप-काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, जेडीएसच्या भांडणात प्रथमच बेळगाव मनपा निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाला बेळगावकर जवळ करतात का झिडकारतात हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

 

Tags: