Accident

खानापूर – हल्याळ महामार्गावर कारची समोरासमोर धडक

Share

दोन कर मध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात घडल्याची घटना खानापूर-हल्याळ राज्य महामार्गावर नावगे क्रॉनजीक घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले आहे.

खानापूर – बेळगाव राज्यमहामार्गावर नावगे क्रॉनजीक दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कारचे मोठे नुस्क्सन झाले आहे. यावेळी एक कार रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या कारमधून लहान मुले, महिला प्रवास करत होत्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर कार जाऊन आदळल्याने एका कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन्ही कारचालक मात्र एकमेकांवर आरोप करताना दिसून आले.

या मार्गावर वरचेवर अशा अपघाताच्या घटना घडत आहेत. या मार्गावर अनेक वळणे आहेत. शिवाय या रस्त्यावरून वर्दळ करणाऱ्या वाहनांचा वेग देखील वाढत चालला आहे. वाहनचालकांनी सावधगिरीने आणि सुरक्षितपणे वाहने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. घटनास्थळी नंदगड पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

Tags: