Belagavi

१० हजार भरा, २५ लाख देऊ : अमिताभ बच्चन यांच्या नावे बोलबच्चनांचा लुटीचा फंडा ! 

Share

 मी अमिताभ बच्चन बोलतोय, तुम्हाला केबीसीत २५ लाख रुपये लागलेत. दिलेल्या अकाउंट नंबरवर १० हजार रुपये भरा, १० मिनिटांत ते रिफंड करण्यासह २५ लाख रु. तुमच्या अकाउंटला जमा होतील असा फोन आल्यास सावधान ! फसू नका

: होय, सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा असा नवा फंडा काही बोलबच्चनांनी सुरु केला आहे. त्यामुळे असा फोन कॉल तुम्हाला आल्यास फसू नका, घाई-गडबडीने कुठल्याही अकाउंटला पैसे भरू नका. अन्यथा तुमची फसवणूक निश्चित आहे. बेळगावचे रहिवासी मुकेश खानापुरे याना असाच एक फोनकॉल आला. परंतु त्यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांची फसवणूक टळली आहे. कौन बनेगा करोडपती मधून अमिताभ बच्चन बोलतोय, तुम्ही केबीसीमध्ये २५ लाख रुपये जिंकले आहेत. ते तुमच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रक्रिया शल्क म्हणून १० हजार रु. भरावे लागतील. ते भरल्यावर १० मिनिटांतच तुमच्या अकाउंटला २५ लाख रु. आणि तुम्ही भरलेले १० हजार रु. रिफंड करण्यात येतील असे त्यांना सांगण्यात आले. मात्र हा कॉल करणारे अमिताभ बच्चन नव्हे तर दुसराच कोणी बोलबच्चन होता.

मुकेश खानापुरे यांनी मात्र यामुळे हुरळून न जाता, गडबड न करता सावध पवित्र घेतला. त्यामुळे २५ लाखांच्या अमिषापोटी १० हजाराला ते फसले गेले नाहीत. त्यामुळे तुम्हीही असा कॉल आल्यास फसू नका हीच आमची अपेक्षा !

 

 

 

 

Tags: