बेळगाव महानगर पालिका निवडणुकीचे आजचे वातावरण पाहता यावेळी भाजपचा महापौर आणि उपमहापौर निवडून येणार हे निश्चित आहे असा दावा बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केला.
व्हॉईस ओव्हर : कोणत्याही परिस्थितीत बेळगाव मनपावर विजय मिळवायचाच असा पण भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे सर्व प्रभागांत निवडून येण्याची क्षमता असलेल्यानाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षनेत्यांनी घेतलाय. रविवारी बेळगावातील गोवावेसजवळील भाजप कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर आ. अभय पाटील यांनी, बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील २५० इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाजपकडे अर्ज केल्याचे सांगितले.बहुधा आजच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे. पक्षाने किमान ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. बेळगाव मनपाच्या इतिहासात प्रथमच चिन्हाच्या आधारे निवडणूक लढवली जातेय. ही परिवर्तनाची नांदी आहे. मनपावर भाजपचा महापौर-उपमहापौर आणून जनतेच्या समस्या सोडवून सुविधा देऊ असे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. अनिल बेनके म्हणाले, सध्याचे वातावरण पाहता बेळगाव मनपात भाजप ४५ हुन अधिक जागा सहज जिंकेल. त्यामुळे यावेळी मनपावर भाजपचा झेंडा फडकवू असा दावा त्यांनी केला. याप्रसंगी भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली, महानगर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, रमेश देशपांडे आदी उपस्थित होते.
बेळगाव मनपावर भाजपची सत्ता निश्चित !
आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके यांचा विश्वास
गोवावेसजवळील भाजप कार्यालयाचे उदघाटन
Recent Comments