Belagavi

फेसबुक फ्रेंडस सर्कल आणि पोलीस उपायुक्तांची कावळेवाडीच्या धावपटूला मदत

Share

राज्यस्तरीय स्पर्धेसह विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या कावळेवाडी येथील होतकरु , उदयोन्मुख धावपटू , प्रेम यल्लाप्पा बुरुड याला फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि पोलीस उपयुक्त डॉ .विक्रम आमटे यांनी क्रीडा साहित्य देऊन त्याची मदत केली .

बेळगाव येथील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांनी त्यांचे मित्र वाय पी  नाई , राहुल पाटील  आणि प्रमोद शर्मा , हे बेळवट्टी गावी  जात असताना , कावळेवाडीचा धावपटू प्रेम बुरुड हा धावण्याचा सर्व करीत असताना दिसला .  यावेळी त्यांनी त्याची चौकशी केली असता , त्याचे वडील यल्लाप्पा बुरुड यांनी आपल्या मुलाबद्दल माहित दिली . गेल्या  ४ वर्षात प्रेमने ,  विविध ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक  पटकावला आहे .  घरची परिस्थिती बेताची असताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर , प्रेम मोठा धावपटू बनण्याचे स्वप्न पाहत त्यासाठी धडपडत असल्याचे यल्लापा बुरड यांनी सांगितले .

या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी , फेसबुक फ्रेंड्स सर्कलसह ,पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी डॉ . विक्रम आमटे आणि देवदत्त देसाई यांनी पुढाकार घेतला .यासंबंधी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे  संतोष दरेकर यांनी आपली मराठीला माहिती दिली .

प्रेम ला बेळगावला बोलवून त्याला  चांगल्या  प्रतीचे ,दोन जोड स्पोर्ट्स शूज , दोन जोड  स्पोर्ट्स ट्रॅक सूट , मोजे , डाएट किट देण्यात आले . डॉ . विक्रम आमटे यांनी प्रेमला कार्यालयात बोलावून कौतुक केले .यावेळी , वाय पी नाईक, यल्लाप्पा बुरुड , राहुल पाटील , प्रमोद शर्मा आणि इतर उपस्थित होते .

Tags: