बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . वार्ड समित्या तसेच युवा समित्या जो उमेदवार निश्चित करतील तोच समितीचा अधिकृत उमेदवार असेल . पुढील विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे असे समितीचे जेष्ठ नेते प्रकाश मरगाळे यांनी सांगितले .
रविवारी , बेळगावच्या रंगुबाई पॅलेस येथे , शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात , समिती नेत्यांनीही बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली .निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिकेची निवडणूक घोषित केली आहे . आतापर्यंत बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिक नगरसेवकांचे वर्चस्व होते . आणि महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती . मात्र मधल्या काळात , समितीतील अंतर्गत कलह आणि बंडखोरी यामुळे महापालिकेवरील महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्थान डगमगले . याचाच फायदा उचलत , राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत .लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी भाषिकांनी आपली एकी दाखवून दिल्याने , आता समितीमध्ये पुन्हा एकीचे वारे वाहू लागले आहेत . आणि महापालिकेवर पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत . या पत्रकार परिषदेत माहिती देताना समितीचे जेष्ठ नेते प्रकाश मरगाळे यांनी सांगितले कि , महाराष्ट्र एकीकरण समिती , शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने असा निर्णय घेतलेला आहे कि महाराष्ट्र एकीकरण समिती तिकीट लादणार नाही, प्रभाग कमिटी, पंच मंडळ , युवक मंडळ , तसेच गणेशोत्सव मंडळे या सर्वाणी मिळून एक उमेदवार द्यावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या , संपूर्ण मराठी जनतेने पाठीशी राहावे . तसेच गटातटाच्या ज्या चुका मागे घडल्या त्या आम्ही संपलेल्या आहेत . पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणूनच प्रत्येक विभाग समितीवर आम्ही ही जबाबदारी सोपवलेली आहे . आणि ह्या समित्या , म ए समितीला आपला एक उमेदवार देतील . तसेच समितीचे कार्यकर्ते समितीशी एकनिष्ठ आहेत आणि ते कोणत्याही पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी जाणार नाहीत तसेच , समितीची ताकद काय आहे हे सहा सप्टेंबरला होणाऱ्या निकालावेळीच समजेल .
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले कि तरुणांना आवाहन करण्याची काही गरजच नाही . राष्ट्रीय पक्षाचे खरे स्वरूप कळल्यानेच सर्व तरुण लोकांशी निवडणुकीत म . ए .समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढले होते . समितीचेच उमेदवार निवडून येथील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा महापालिकेवर फडकविणार असा विश्वास व्यक्त केला .
विकासाला कुठेही न डावलता मराठी माणसांच्या हक्कासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती न्याय मिळेपर्यंत लढत राहणार . महाराष्ट्र एकीकरण समिती ही सर्वसमावेशक आहे आणि , यावेळी आमच्या सोबत सर्वभाषिक आहेत आणि सर्व ५८ वार्डांमध्ये , समिती पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे .
एकंदरीत महाराष्ट्र एकीकरण समिती देखील आपली पूर्ण ताकदीनिशी आता महापालिकेची निवडणूक लढवण्यास सज्ज झाली आहे . प्रभाग समित्या जो उमेदवार निश्चित करतील तोच उमेदवार समितीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवेल असा निर्णय घेण्यात आला आहे .
Recent Comments