: काबूलमधील भारतीय राजदूतावासात सुरक्षा सैनिक म्हणून सेवा बजावत असलेले चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावचे जवान दस्तगीर मुल्ला सुरक्षित भारतात परतले आहेत.

: जवान दस्तगीर मुल्ला याना भारतात सुरक्षित आणण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. त्यामुळे मुल्ला कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत. दस्तगीर यांनी १२ ऑगस्ट रोजी कुटुंबियांशी संपर्क साधून आपली परिस्थिती कठीण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते. मात्र १५ ऑगस्ट रोजी त्यांनी संपर्क साधून आपण सुखरूप भारतात परतल्याचे सांगितले.
त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. दस्तगीरची पत्नी जुबेद मुल्ला ८ महिन्यांची गरोदर आहे. त्याचप्रमाणे त्याचे वृद्ध आई-वडील आहेत. यासंदर्भात माहिती देताना जुबेद मुल्ला यांनी सांगितले की, माझे पती काबूलमध्ये सैन्यात सेवा बजावत होते. त्यांना फोन केल्यावर त्रासात असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आम्ही काळजीत होतो. मात्र मात्र स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला ते भारतात परतले असल्याचे सांगितले. पती सुखरूप भारतात परतल्याने आम्हाला दिलासा मिळाला असल्याचे जवानांच्या पत्नीने सांगितले.


Recent Comments