भाऊ–बहिणीच्या पवित्र नात्याचा रेशीमबंध अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभर आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आपल्या मतदारसंघातील बंधूंना राखी बांधून हा सण साजरा केला.
होय, प्रतिवर्षी आ. लक्ष्मी हेब्बाळकर ग्रामीण मतदारसंघातील आपल्या बंधूंना आपल्या निवासस्थानी बोलावून राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा पवित्र सण साजरा करतात. प्रतिवर्षाप्रमाणे आज रविवारी बेळगावातील कुवेम्पू नगरातील आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भावांचे औक्षण करून राखी बांधून मिठाई भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर व त्यांची पत्नी तसेच कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, गेल्या वर्षी कोविडमुळे रक्षाबंधन सण साजरा करता आला नव्हता. मात्र आपली संस्कृती विसरू नये या भावनेने यावेळी भावांना राखी बांधून त्यांच्यासमवेत हा शुभ दिवस आनंदात व्यतीत करत आहोत. यावेळी सुरेश गवन्नावर यांनी, बेळगावातील आपल्या सर्व भावना बोलावून त्यांना राखी बांधून, मिष्टान्न देऊन, तुमच्या सर्व सुखदुःखाच्या प्रसंगी मी तुमच्या सोबत आहे असा अभयहस्त लक्ष्मीअक्का यांनी दिला आहे याबाबत आनंद व्यक्त केला. बाईट
एकंदर, आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, आपल्या कुटुंबात जन्म घेऊन सोबत वाढलेले तेवढेच आपले भाऊ नसून मतदारसंघातील सर्वचजण आपले भाऊ आहेत असा संदेश रक्षाबंधनाच्या माध्यमातून दिला आहे हे प्रशंसनीय आहे.
Recent Comments