Belagavi

आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची जीभ पुन्हा घसरली

Share

 

 तालिबान हे बुद्धिजीवींचे अपत्य आहे असे सांगतानाच राहुल गांधी नक्की कोणत्या धर्मात जन्मले असा सवाल करत विजापूरचे . बसनगौडा पाटीलयत्नाळ यांची जीभ पुन्हा घसरली.

 

विजापुरात पत्रकारांशी बोलताना आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची जीभ पुन्हा घसरली. अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या हिंसाचाराबद्दल देशातील बुद्धिजीवी, राहुल गांधी, डी. के. शिवकुमार का बोलत नाहीत. जर हे पंतप्रधान असते तर त्यांनी तालिबान्यांना इम्पोर्ट केले असते. पंतप्रधान मोदींमुळे आम्ही हिंदू देशात सुरक्षित आहोत. देशातील तालिबान्यांना, त्यांच्या समर्थकांवर गोळ्या घातल्या पाहिजेत. नाही घातल्या तर त्यांचा उच्छाद वाढेल असे आ. यत्नाळ म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जात, राहुल कोणत्या धर्मात जन्मले? ते हिंदूही नाहीत अन ख्रिश्चनही. ते मुस्लिम माता-पित्याचे पुत्र असल्यासारखे आहेत असे सांगतानाच यत्नाळ यांनी बॉलिवूडच्या खान मंडळींवरही टीका केली. भारत सुरक्षित नाही अशी आवई उठवणाऱ्या खानांनी खुशाल अफगाणिस्तानमध्ये जाऊन रहावे. मोदी आणि देशाविरोधात बोलणाऱ्या ओवैसींना चांगला धडा शिकवला पाहिजे जमखंडीच्या युवकाने तालिबान्यांना फोन केल्याबाबतच्या मुद्यावर अशा डॅश डॅश हलकटांना तालिबान्यांकडेच पाठवायला हवे, आमच्या देशात आसरा देऊन नये अशी मागणी केली.

यावेळी आ. यत्नाळ यांनी स्वामीजींवरही टीका केली. इस्लाम धर्म कोणालाही बंधुभावाची वागणूक देत नाही. काही अपात्र स्वामीजी आपल्या प्रवचनातून हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे नारे देतात. माणुसकीचा विजय असो म्हणतात. ते आता का मूग गिळून गप्प बसले आहेत? एवढी आंदोलने यांनी केली, आता तालिबान्यांच्या विरोधात ते चकार शब्दही का काढत नाहीत असा सवाल आ. यत्नाळ यांनी केला. बाईट

आ. यत्नाळ पुढे म्हणाले, अफगाणिस्तानातून येऊ पाहणाऱ्या केवळ हिंदूंना आणि शीखांनाच भारतात आसरा द्यावा. दुसर्यांना देऊ नये. जर दुसरे येणार असतील तर त्यांनी हिंदू, बौद्ध, जैन धर्म स्वीकारावा अशी अट घालावी. पठाण भेकड आहेत. स्वतःला धाडसी, शूर म्हणवतात आणि बायका-पोरांना सोडून पळ काढतात अशी जहरी टीका केली.      बाईट एकंदर वादग्रस्त विधाने करताना आ. यत्नाळ यांची जीभ पुन्हा घसरल्याचे या निमित्ताने दिसून आले.

Tags: