शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी एका शेतकरी नेत्याने चक्क मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पाय धरल्याची घटना शनिवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये घडली.
होय, मुख्यमंत्री झाल्यानंतर बोम्मई शनिवारी प्रथमच बेळगाव दौऱ्यावर आले. सुवर्णसौधमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड, महापूर आणि अन्य समस्या व उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. तत्पूर्वी बैठकीसाठी मुख्यमंत्री येत असताना शेतकरी नेत्यांनी त्यांची भेट घेऊन, सरकारी कार्यालयांचे सुवर्णसौधमध्ये स्थलांतर करावे, साखर आयुक्तांची कचेरी कायमस्वरूपी बेळगावातच सुरु करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, पूरग्रस्त गावांच्या समस्येवर कायमचा तोडगा काढावा आदी मागण्या केल्या. हि चर्चा सुरु असतानाच शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी चक्क मुख्यमंत्र्यांचे पाय धरत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची विनवणी केली. त्यामुळे सगळेच अवाक झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उठवत कशीबशी समजूत घातली.
Recent Comments