Belagavi

गणेश उत्सवाला द्या त्वरित परवानगी श्री राम सेनेची मागणी

Share

सार्वजनिक गणेशोत्सवाला पूर्णपणे अनुमती देण्यात यावी तसेच घातलेले निर्बंध त्वरित मागे घ्यावेत असे निवेदन , बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्या वतीने देण्यात आले .

:  कित्येक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने सुरु असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट आहे . गणेश उत्सव साजरा करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , सरकारने निर्बंध लागू केले आहेत . या सणावर अवलंबून असलेले मूर्तिकार , मंडप डेकोरेटर्स ,  विद्युत रोषणाई , साउंड सिस्टीम , फुले आणि फळे विक्रेते यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे .कोविड नियमांचे पालन करीत ,मॉल ,  चित्रपट गृहे , राजकीय सभा , मेळावे, निवडणूक ,दारू दुकाने, या सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे . तरीही सरकारने अनुमती दिली आहे . त्यामुळे ,वर्षातून एकदा येणाऱ्या या पारंपरिक गणेश उत्सवाला परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला करण्यात आले .

यावेळी रवी कोकितकर, विनय अंगरोली , अजित पाटील , नागेश सराफ , लक्ष्मण कुरंगे , सचिन गडकरी , सचिन गरडे , अक्षय पाटील , विनय हंगिरगेकर ,शशी मिसाळे , सचिन तिप्पट , संतोष जाधव , कल्लाप्पा पाटील , राघवेंद्र कंभार आदी उपस्थित होते .

 

 

Tags: