Vijayapura

आलमट्टी धरणात मुख्यमंत्र्यांकडून गंगापूजन

Share

संपूर्ण क्षमतेने भरलेल्या विजापूरच्या आलमट्टी धरणात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी गंगापूजन करून ओटी अर्पण केली.: उत्तर कर्नाटकाची जीवनदायिनी असलेल्या कृष्णा नदीवर बांधलेल्या आलमट्टी येथील लाल बहादूर शास्त्री जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. विजापूर जिल्ह्यातील निडगुंडी तालुक्यातील या धरणाची मुख्यमंत्री बोम्मई यांनी शनिवारी गंगापूजा केली.

यावेळी विजापूर जिल्हा पालकमंत्री शशिकला जोल्ले, मंत्री मुरुगेश निराणी, उमेश कत्ती, गोविंद कारजोळ, आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ, ए. एस. पाटील-नडहळ्ळी आदी उपस्थित होते.

Tags: