Belagavi

अखेर विनय कुलकर्णी यांची सुटका; समर्थकांकडून दणक्यात स्वागत

Share

 खुनाच्या गुन्ह्यात गेल्या महिन्यांपासून हिंडलगा तुरुंगात असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची अखेर शनिवारी सकाळी जामिनावर सुटका करण्यात आली. धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगेशगौडा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नेते व माजी मंत्री विनय कुलकर्णी याना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ५ नोव्हेम्बर २०२० पासून कुलकर्णी हिंडलगा तुरुंगात कैद होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी शासकीय सुटीमुळे जमीन आदेशाची परत तुरुंगाधिकाऱ्यांना  मिळालेली नव्हती.

आज, शनिवारी सकाळी जामीन आदेशाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना आणि हिंडलगा तुरुंग प्रशासनाला स्पीड पोस्टाद्वारे देण्यात आली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून विनय कुलकर्णी यांची जामिनावर सुटका करण्यात आली.सुटकेनंतर विनय कुलकर्णी यांच्या समर्थकांनी त्यांना सफरचंदाचा आणि फुलांचे हार घालून दणक्यात स्वागत केले. यावेळी विनय कुलकर्णी यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. मोठ्या संख्येने वाहनातून समर्थक आल्याने हिंडलगा तुरूंगासमोर वाहनांची लांबचलांब रंग लागली होती. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विनय कुलकर्णी हे आपले भाऊ असल्यासारखे आहेत असे सांगत त्यांचे स्वागत केले.

 

 

 

Tags: