अँकर : बेळगाव तालुक्यातील अगसगे गावातील बाबासाहेब आंबेडकर गल्लीत गटारीचे पाणी निचरा न होता रस्त्यावर पसरत असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेत जलवाहिन्या घालण्यासाठी अगसगे गावात २ महिन्यांपूर्वीच रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र अजून ते बुजवले नाहीत. ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
आधीच पावसामुळे डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. असे असले तरी पंचायत अधिकाऱ्यांनी याकडे काणाडोळा केल्याने या रोगांच्या पसरण्याचा धोका ठळक झाला आहे. गावात डेंग्यू, मलेरियासारखे रोग पसरल्यास त्याला केवळ पिडिओच जबाबदार राहतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. रस्त्यावर गटारीचे पाणी पसरत असल्याने नागरिकांना तेथून वाट काढताना कठीण जात आहे. शिवाय रोगांचाही धोका वाढला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, अन्य लोकप्रतिनिधी आणि पिडिओनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Recent Comments