Belagavi

लहान मुलांच्या तपासणीच्या नंदन वात्सल्य कार्यक्रमाचा शुभारंभ

Share

:कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी मुलांची  आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला .

गुरुवारी जिल्हा प्रशासन , जिल्हा पंचायत , आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग ,शिक्षण विभाग , महिला आणि  बालविकास खाते , बेळगाव महानगर पालिका , आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने , वडगाव येथील शाळा क्रमांक  १४ मध्ये, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर , मुलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय या उदघाटन करण्यात आले . या कार्यक्रमात , जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ एस व्ही मुन्याळ    यांनी उदघाटन केले .  माता आणि मुलांची विशेष आरोग्य तपासणी करणाऱ्या या कार्यक्रमामध्ये , तिसऱ्या लाटेचा  मुलांवर परिणाम होणार असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे .त्यामुळे या नंदन वात्सल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमात जिल्हा माता शिशु आणि लसीकरण अधिकारी डॉ आय पी गडाद म्हणाले कि , मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर , कुटुंबाची परिस्थिती शोचनीय बनते . त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करून , परिणाम होण्याआधी , खबरदारी घेतली पाहिजे . कार्यक्रमात श्री एम एस रोट्टी , शिशु विकास अधिकारी बेळगाव ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ .शिवानंद मास्तीहोळी , महानगर पालिकेचे वैद्याधिकारी डॉ .संजय दुंमगोल , डॉ प्रकाश वाली ,श्री शिवाजी मळगेनन्नावर , शिक्षण विभागाचे अधिकारी , आशा आणि अंगणवाडी , कर्मचारी उपस्थित होते .

 

 

Tags: