आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन विजापूरहून धारवाडमध्ये अभ्यासासाठी आलेल्या एका होतकरू तरुणाचा धारवाडमधील मॉडर्न हॉलजवळ दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
महेश बजंत्री असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून, तो मूळचा विजापूरचा रहिवाशी होता. बुधवारी रात्री उशिरा तो दुचाकीवरून धारवाड टोलनाका मार्गावरून विद्यागिरीजवळील दाणेश्वरी नगरातील आपल्या रूमवर चालला होता. यावेळी मॉडर्न हॉलजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि फूटपाथ दुभाजकाला दुचाकी वेगाने धडकली. त्यामुळे तो रस्त्यावर आपटला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मूळच्या विजापूर जिल्ह्यातील महेशचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. अभ्यास करून परीक्षेची तयारी करण्यासाठी तो धारवाडला आला होता. त्यासाठी त्याने दानेश्वरी नगरात रूम केली होती. धारवाड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Recent Comments