एखादे दृश्य आपल्या मनाने विविध अँगलने आपल्या कॅमेऱ्यात कैद करणे ही सामान्य बाब नाही . फोटोत जिवंतपणा आणणे हे फार कठीण असते . यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती प्रत्येकाला जमत नाही . हे फक्त छायाचित्रकारच करु शकतो . जागतिक फोटोग्राफह्य दिनानिमित्त सादर आहे हा रिपोर्ट ….
कोणत्याही गोष्टीचे फोटो काढताना , फोटोफ्रेम सिमिट्री जितकी योग्य असेल तेव्हढा फोटो उत्तम येईल आणि तो पाहताना तितिकाचा आनंद मिळेल . पण बरेचदा लोक सिमिट्रीकडे लक्ष देत नाहीत . फक्त पाहतात आणि क्लिक करतात . ज्याचा फोटो आपण काढणार आहोत त्याच्या डावीकडे , उजवीकडे , वरती , खाली अशा चारही ठिकाणी समान स्थान असायला हवे . कुठे रिक्त जागा सोडायची हे अनुभव आणि आवड यावर अवलंबुन आहे . पण फोटोग्राफर पी कि बडिगेर यामध्ये कुशल आहेत . कुठलेही नैसर्गिक दृश्य , जसे , झऱ्याचा फोटो काढताना , फोरग्राउंडमध्ये झाडेझुडपे आदी फोटोत घेतल्याने ते दृश्य अधिक आकर्षक दिसते . नाहीतर ते फोटो काही खास दिसत नाहीत . पण पी के बडिगेर यांच्या फोटोत जिवंतपणा आढळून येतो .
साधारणपणे फोटो तर सर्वच काढतात . फोटोमध्ये मॉडर्न आर निर्माण करणे ही देखील एक कला आहे . नवनवीन क्लुप्त्या लढवून , फोटो काढण्यास काय हरकत आहे . असे अनेक प्रकारचे फोटो त्यांनी काढले आहेत .आपली कल्पना शक्ती वापरून तुम्ही फोटोमध्ये स्पेशल इफेक्टस आणू शकता .आकाशातील ढग फोटोग्राफर्सना सदैव आकर्षक करतात . त्यांना निसर्ग सौंदर्याशी मिळवा . त्यांच्या शिवाय फोटो अर्धवट भासेल . पण या ही ठिकाणी सिमिट्री योग्य असणे आवश्यक आहे .
सवदत्ती तालुक्यातील मदलुर येथील मूळचे पी के बडिगेर , हे आपल्या वडिलांबरोबर सुतार काम करीत असत . पण हा व्यवसाय न करता बडिगेर यांनी सवदत्ति येथील तोंटदार्य श्री सिद्धलिंगेश्वर महाविद्यालयांत चित्रकलेचे शिक्षण घेऊन, पुढे पेंटर म्हणून व्यवसाय केला . यानंतर अनेक दैनिकांसाठी त्यांनी काम केले . आता ते माहिती आणि जनसंपर्क विभागात छायाचित्रकार म्हणून काम करीत आहेत .पीके बढ़िगेर याना धारवाड़च्या आरके छाया फाउंडेशन आणि सृष्टि संघटनेकडून बिम्ब भाव पुरस्कार , बाबूराव ठाकुर पुरस्कार देण्यात आले आहेत .जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्त सर्व छायाचित्रकारांना खूप खूप शुभेच्छा
Recent Comments