बेलवडी मल्लमांचा खरा इतिहास बदलून , छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे चित्र रेखाटून , ते इंस्टाग्रामवर वायरल करणाऱ्यांविरुद्ध , बेळगावच्या खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .: ” नवीन नान कन्नडीग ” या इंस्टाग्राम अकाउंटवर , बेलवडी मल्लामा यांच्या जयंती उत्सवावेळी , हा फोटो वायरल करण्यात आला आहे .

बेळगाव शहरातील बापट गल्लीतील रहिवासी रोहित भाऊसाहेब मुरकुटे यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात ” नवीन नान कन्नडीग ” या इंस्टाग्राम आयडी असलेल्या व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे .
खऱ्या इतिहासाची माहिती नसताना , या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे . त्याचप्रमाणे , बेळगावमधील कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये प्रतिकूल वातावरण निर्माण करणाऱ्या या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे .


Recent Comments