कर्नाटक विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ सप्टेंबरपासून भरणार आहे. कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी गुरुवारी बेंगळुरात ही माहिती दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधानसौधमध्ये मंत्रिमंडळाची महत्वाचीं बैठक पार पडली. बैठकीतील निर्णयांची पत्रकारांना माहिती देताना कायदा व संसदीय व्यवहार मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी सांगितले की, १३ ते २४ सप्टेंबरपर्यंत विधिमंडळाचे १० दिवसीय पावसाळी अधिवेशन विधानसौधमध्येच भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मधुस्वामी म्हणाले, राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स वाटण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याशिवाय राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
कोविड व अन्य कारणांमुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास विलंब झाला होता. त्यामुळे विरोधकांनीही अधिवेशन घेण्याची मागणी जोर लावून धरली होती. अखेर आज विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असेल.


Recent Comments