Hukkeri

हुक्केरीत लोकअदालतीत ६८० प्रकरणे निकाली

Share

: हुक्केरी तालुक्यातील न्यायालयात मेगा लोकअदालत पार पडली असून, ६८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. वरिष्ठ दिवाणी न्या. के. एस. रोटटेर यांनी ही माहिती दिली हुक्केरीत बुधवारी पत्रकारांना ही माहिती देऊन न्या. के. एस. रोटटेर यांनी सांगितले की, हुक्केरी तालुक्यातील २ न्यायालयात मेगा लोकअदालत घेण्यात आली. त्यात एकूण ४४०३ प्रकरणांपैकी ६८० प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत.

त्याचप्रमाणे ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या १८८ प्रकरणात सामंजस्याने तोडगा काढण्यात आला असून, ११ लाख २१ हजार रु. वसुलीचा आदेश दिला आहे. त्याशिवाय राष्ट्रीयीकृत बँकांशी संबंधित ५८ प्रकरणात १ कोटी ९९ लाख, ३६ हजार रु. वसुलीचा आदेश देवून ही प्रकरणे निकालात काढली आहेत. यासाठी सहकार्य दिलेले वकील, बँका आणि पक्षकारांबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी दिवाणी न्या. अंबण्णा के., हुक्केरी वकील संघाचे अध्यक्ष डी. के. अवरगोळ, उपाध्यक्ष आय. के. हुलीकट्टी, सचिव एच. एल. पाटील, कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य बसवराज हुंडेकर, रवी चौगला उपस्थित होते.

 

Tags: