Belagavi

शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरींना भेटणार : राजू शेट्टी

Share

 दरवर्षी अतिवृष्टीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागातील शेतकऱ्यांना होणार त्रास टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील पुलांची उंची वैज्ञानिकदृष्ट्या वाढवण्याची गरज आहे. यासंदर्भात केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शेतकरी नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी बेळगावला भेट देऊन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची भेट घेऊन महामार्गावरील पुलांची उंचीवाढवण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या नद्या ३०० किमी वाहात कृष्णा, हिरण्यकेशी, दूधगंगा, वेदगंगा आणि पंचगंगा नद्यांना येऊन मिळतात. अतिवृष्टीमुळे गेल्या १५ वर्षांपासून या नद्या प्रवाहित होऊन पूर येऊन पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग पावसात बंद होतो. त्यामुळे महामार्गावरील पुलांची उंची वाढवण्यावर विचार सुरु आहे. परंतु केवळ पुलांची उंची वाढवून चालणार नाही तर पुराचे पाणी सुरळीत वाहून जाण्याचीही सोय केली पाहिजे असे शेट्टी म्हणाले. बाईट

पुरामुळे शेतकऱययांच्या शेतात पाणी साचून राहत आहे. त्यासाठी सरकारकडून पूर्ण भरपाई देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील शेतकऱ्यांची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे असे शेट्टी म्हणाले,

यासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. कर्नाटक आणि महाराष्ट्राने एकत्रितपणे कार्य केल्यासच हि समस्या सोडवता येईल असे ते म्हणाले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: