Khanapur

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले मलप्रभेत गंगापूजन

Share

: खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बुधवारी मलप्रभा नदीत विधिवत गंगापूजन केले.

होय, खानापूर शहरासह संपूर्ण तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या मलप्रभा नदीचे आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी बुधवारी गंगापूजन केले. दरवर्षी खानापूर नगरपंचायतीच्या वतीने मलप्रभा नदीचे गंगापूजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार यावर्षीही आ. निंबाळकर यांच्याहस्ते विधिवत गंगापूजन करण्यात आले.यावेळी बोलताना आ. निंबाळकर म्हणाल्या, खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी १२ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची विनंती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना भेटून केली आहे. किती अनुदान मंजूर होते हे पाहून शहरात विकासाची कामे हाती घेण्यात येतील. त्याशिवाय नव्या पुलासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी खानापूर नगरपंचायतीचे अध्यक्ष मजहर खानापूरी, उपाध्यक्ष लक्ष्मी अंकलगी, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, सदस्य मेघा कुंदरगी, प्रकाश बैलुरकर, मीनाक्षी बैलुरकर, शोभा गावडे, लता पाटील, मुख्याधिकारी विवेक बन्नी, प्रेमानंद नाईक आदी उपस्थित होते.

 

Tags: