शेतकऱ्यांच्या नावे शपथ घेऊन कमळ उगवणारे सरकार खरोखरच शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जामुळे मृत्यूला कवटाळलेल्या एका शेतकऱ्याच्या गुणी मुलांना केवळ कर्जापोटी, पैशांअभावी उच्च शिक्षण घेण्यात अडचण आली आहे. पाहुयात याबाबत एक रिपोर्ट… !

सैनिक लढला तर देशाच्या सीमांचे रक्षण होते आणि शेतकरी राबला तर देशाचे पोट भरते. राजकारणी शेतकऱ्यांचा केवळ उदो-उदो करतात. मात्र त्यांच्यासाठी काई करायची वेळ आली की, मागे हटतात. नैसर्गिक आपत्तीमुळे हात-तोंडाशी आलेले सर्व पीक नष्ट झाल्याने आणि कर्जाचा भर असह्य झाल्याने बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हिरेकोप्प गावातील शेतकरी ईश्वरप्पा चिकोप्प याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. मात्र अद्याप त्याच्या कुटुंबाला सरकारकडून फुटकी कवडीही मिळालेली नाही. स्थानिक सरकारी अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाने अद्याप भरपाई न दिल्याने या शेतकऱ्याचे कुटुंब हलाखीत जगत आहे. हुशार असुनही मुलांना शिकवायला पैसे नाहीत. कर्जदाते रोज घरासमोर येऊन ओरड करतात. पैशांअभावी कसे जगायचे समजेनासे झाले आहे. आम्हाला आसरा द्या अशी आर्त विनवणी या शेतकऱ्याची पत्नी अनुसया हिने जिल्हाधिकाऱ्यांना रड्तरड्त केली.
वडिलांनी आत्महत्या करून एक वर्ष लोटले तरीही जिल्हा प्रशासनाकडून कसलीच मदत मिळालेली नाही. आम्ही प्रामाणिक व दक्ष पोलीस अधिकारी व्हायचे स्वप्न पहिले आहे. मात्र कुटुंबावरील कर्जाचा डोंगर हा त्यांना शाप ठरला आहे. जिल्हा प्रशासनाने भरपाई दिल्यास कर्ज फेडून उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे. मात्र अधिकारी दाद देईना झाले आहेत. त्यामुळे त्वरित भरपाई मिळवून द्या अशी विनंती शेतकऱ्याची मुलगी चित्रा चिक्कोप्प हिने जिल्हाधिकाऱ्यांना केली
दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. त्यावर सरकारकडून होणाऱ्या भरपाईच्या घोषणा हवेतच विरतात. अशा शेतकरी कुटुंबांचे काय होणार हा मनाला सतावणारा प्रश्न आहे.


Recent Comments