Belagavi

बेळगावात झोपडपट्टीवासियांची निदर्शने; खासगीकरणाचा निषेध

Share

 वीज आणि पाणी पुरवठ्याचे खासगीकरण आणि रेशन देताना बायोमेट्रिक पद्धत सक्तीची केल्याच्या निषेधार्थ स्लम जनआंदोलन समिती, कर्नाटक, बेळगाव झोपडपट्टी हितरक्षण वेदिकेतर्फे बेळगावात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपडपट्टीवासियांनी स्लम जनआंदोलन समिती-कर्नाटक, बेळगाव झोपडपट्टी हितरक्षण वेदिकेच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांनी सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन दिले. यावेळी ‘आपली मराठी’शी बोलताना स्लम जनआंदोलन समिती, कर्नाटक, बेळगाव झोपडपट्टी हितरक्षण वेदिकेचे फकीरप्पा तळवार म्हणाले, सरकारने वीज आणि पाणी पुरवठ्याचे खासगीकरण केल्याने खासगी कंपन्या मन मानेल तशी बिले आकारत आहेत. त्याशिवाय बायोमेट्रिक पद्धतीने रेशन देण्यात येत असल्याचंही त्यांनी निषेध केला.

एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, रेशन देण्यासाठी बायोमेट्रीक पद्धत सक्तीची करणे चुकीचे आहे. कारण एखादेवेळी कार्डधारक व्यक्ती रेशन घेण्यास काही कारणाने जाऊ शकली नाही तर त्या कुटुंबाला रेशनपासून वंचित रहावे लागेल अशी नाराजी व्यक्त केली. यावेळी स्लम जनआंदोलन समिती-कर्नाटक, बेळगाव झोपडपट्टी हितरक्षण वेदिकेचे कार्यकर्ते, व झोपडपट्टीवासिय उपस्थित होते.

 

 

 

Tags: