Banglore

केंगल हनुमंतय्या यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची भेट

Share

 कर्नाटकचे दुसरे मुख्यमंत्री आणि विधानसौधचे निर्माते केंगल हनुमंतय्या यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी बेंगळूर येथे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि विधानसौधचे निर्माते केंगल हनुमंतय्या यांच्या जीवनातील गोड आठवणी जागे करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे केंगल हनुमंतय्या यांच्या कन्या विजयालक्ष्मी तिम्मय्या यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंगल हनुमंतय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील तसेच विधानसौधच्या निर्मितीवेळची छायाचित्रांची पाहणी केली.

 

Tags: