Crime

नातवाकडून आजीचा निर्घृण खून

Share

धारवाड जयनगर मध्ये  नातवानेच आपल्या आजीचा निर्घृण खून केल्याची घटना धारवाडच्या जयनगरमध्ये घडली आहे .

:  धारवाडच्या जयनगर लास्ट स्टॉप जवळील , श्री दुर्गादेवी कॉलनीमध्ये , भिमव्वा शिंदे या वृद्ध  महिलेचा तिचा नातू , दत्तू शिंदे याने निर्घृण खून केला आहे . या आजी आणि नातवाचे भांडण सोडवायला गेलेल्या , आपल्या आईवर देखील दत्तू शिंदे याने हल्ला केला आहे . ती देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. याबद्दल उपनगर पोलीस स्थानकात प्रकरण दाखल करण्यात आले आहे .

 

Tags: