Khanapur

प्रकाशाने उजळून निघाले वाजपेयीनगर !

Share

गेली वर्षे वीजजोडणीविना अंधारात बुडालेले खानापुरातील वाजपेयीनगर आता प्रकाशाने उजळून निघाले आहे. . डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नाने अखेर वाजपेयीनगरला हेस्कॉमकडून वीजपुरवठा करण्यात आला आहे.

होय, खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पूर्वीच्या दुर्गानगर व आता वाजपेयीनगरला नवे उपनगर असल्यावरून गेली ४ वर्षे वीजपुरवठा करण्यात आला नव्हता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी येथे वीजपुरवठा केला जावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे अखेर हेस्कॉमकडून याठिकाणी वीजपुरवठा करण्यात आला आहे. रहिवाशांनी वीजखांबची पूजा करून व बटन दाबून प्रकाशाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ‘अंजलीताईंचा विजय असो’ अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि वाजपेयी नगरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: