चिकोडी तालुक्यातील श्री वीरभद्रेश्वर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे . कोविड नियमांनुसार भक्ताना मंदिरात प्रवेश दिला जात आहे .

: महामारी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी , राज्यभरात सरकारने लॉक डाऊन जारी केले होते . या नियमांनुसार , मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली होती . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता कमी झाला आहे . त्यामुळे सरकारने अनलॉक ३ जारी करुन मंदिरे खोलण्यासाठी परवानगी दिली आहे .
चिकोडी तालुक्यातील सर्व मंदिरे आजपासून सुरु झाली आहेत . चिकोडी तालुक्यातील येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिराच्या प्रमुख द्वारावर पूजा करुन मंदिर खुले करण्यात आले . भक्तांना , कोरोनाचे नियम पाळून , मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे . भाविक देखील कोरोना नियमांचे पालन करुन श्री वीरभद्रेश्वराचे दर्शन घेत आहेत . मागील अनेक महिन्यांपासून हे मंदिर बंद होते . त्यामुळे श्री वीरभद्रेश्वराचे दर्शन होत नव्हते . आज सकाळी मंदिर खुले झाल्याची खबर मिळताच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली .
आपली मराठीला माहिती देताना , मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले कि ,आजपासून मंदिरे खुली करण्यात आली आहेत . कोरोना नियमांचे पालन करुन , दर्शनासाठी भक्तांना परवानगी देण्यात आली आहे . महाराष्ट्रातून जास्त भक्त येत असल्याने कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे .मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश निषिद्ध आहे . अभिषेक , तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम सध्या बंद आहेत . मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे खुली झाल्याने , भक्तगण मंदिराकडे येऊ लागले आहेत .


Recent Comments