Hukkeri

राष्ट्रीय फलोत्पादन मिशन अंतर्गत फळविक्रेत्यांना फिरते वाहन सुपूर्द

Share

हुक्केरी तालुक्यातील फळ विक्रेत्यांना योग्य बाजारपेठ आणि फळे साठवून ठेवण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था करणे आवश्यक आहे असे मत आ . सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले आहे .

ते आज हत्तरगी जवळील राजा लखमगौडा जलाशयाच्या मुख्य रस्त्यावरील जिनराळ क्रॉस जवळ पपई , पेरू , द्राक्ष , कलिंगड ,  आदी  विवीध भागांमधील फळे रस्त्यावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना , बेळगाव  बागायती विभागाच्या वतीने, राष्ट्रीय फलोत्पादन मिशन अंतर्गत सुमारे  ३ लाख  १५  हजार रुपयांच्या सह्यधानातून , मोबाईल वाहन वितरित करुन ते बोलत होते .

त्यानंतर माध्यमांशी बोलताना ,  ते म्हणाले कि , यमकनमर्डी भागातील शेतकरी फळांचे उत्पादन घेतात . मात्र  त्यांना योग्य बाजारपेठ तसेच फळे साठवणूक करण्यासाठी शीतगृहाची सोय  करण्याची योजना आहे . सध्या  बागायती विभागाकडून , फिरती फळ विक्री सुरु करण्यात आली आहे , त्यामुळे ग्राहकांना उत्तम दर्जाची फळे मिळतील .  बेळगाव जिल्हा बागायती विभागाचे उपसंचालक रवींद्र हाकाटी  यांनी या योजनेसंबंधी आमदारांना माहिती दिली . बेळगाव जिल्ह्यात प्रथमच रस्त्यावर फळे विक्री करण्यासाठी ,हे वाहन देण्याची योजना असल्याचे सांगितले .

यावेळी , हुक्केरी बागायती विभागाचे वर्षात सहाय्यक  तात्यासाब नांदणी ,   बसवराज बरीमनी  , सिद्दारुढ  तुप्पद , विद्या बेटगेरी , मंजुनाथ पाटील ,  महांतेश मगदूम , रवी जिनराळे , दस्तगीर बसपुरी , किरण  राजपूत , महादेव पाटोळी, आणि इतर उपस्थित होते .

 

Tags: