Belagavi

लसीकरण शिबिरातच मार्गसूचीचे उल्लंघन

Share

 लसीकरणासाठी आतूर झालेल्या नागरिकांकडूनच लसीकरण शिबिरात कोविड मार्गसूचीचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार बेळगावात घडत आहेत. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाकडून शनिवारी समादेवी मंगल कार्यालयात आयोजित लसीकरण कार्यक्रमात याची प्रचिती आली.

: सरकारी लसीकरण केंद्रांवर तर लशीसाठी होणारी गर्दी नेहमीचीच आहे. मात्र अनेकदा हेलपाटे मारून, तासनतास रांगेत थांबूनही तेथे लस मिळत नसल्याने लोक वैतागले आहेत. त्यामुळेच की काय, काही खासगी संस्थांकडून आयोजित लसीकरण कार्यक्रमातही कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून गर्दी केली जात असल्याचे दिसत आहे. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाकडून शनिवारी समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबीयांकरिता आयोजित लसीकरण कार्यक्रमात याची प्रचिती आली. याठिकाणी रांगेत न थांबता, घोळके करून नागरिक थांबलेले दिसले.  यावेळी बोलताना आ. अनिल बेनके यांनी, मूर्तिकारांसाठी लसीकरणाचा उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. बेळगाव उत्तर मतदार संघाला ५० लाख लशी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री सुधाकर यांनी मान्य केले  आहे. यापैकी २५ लाख लशी एक-दोन दिवसांत उपलब्ध होतील. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य आहे. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोना दह्यात गेलेला नाही, त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन आ. बेनके यांनी केले. यावेळी महामंडळाचे विजय जाधव, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: