: सैन्यात सेवा बजावत असताना मेंदूज्वराने मरण पावलेला जवान विनोद शंकरप्पा उळागड्डी (वय ३५) यांच्या पार्थिवावर शनिवारी संपगांव येथे तमाम शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागालँड येथे सेवा बजावत असलेला आसाम रेजिमेंटचा जवान विनोद उळागड्डी यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर बैलहोंगल तालुक्यातील संपगांव या त्यांच्या मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची गावात अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्यानंतर पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. गर्दी जमल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी संपगांव आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. अंत्यदर्शनानंतर जवान विनोद यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी गावकऱ्यांनी जवान विनोद याना अखेरचा निरोप दिला. 


Recent Comments