Athani

आमदार महेश कुमठळ्ळी  यांनी बनसोडे कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

Share

हल्याळ गावातील एकाच कुटुंबातील चार भावांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला .  या बनसोडे कुटुंबीयांची  , अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी  यांनी भेट देऊन,  त्यांचे सांत्वन केले .

अथणी तालुक्यातील हल्याळ गावातील एकाच कुटुंबातील सदाशिव बनसोडे, शिवानंद बनसोडे , धरेप्पा बनसोडे ,आणि परसप्पा बनसोडे या चौघा भावांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला . या बनसोडे कुटुंबियांच्या घरी , अथणीचे आ . महेश कुमठळ्ळी  यांनी भेट देऊन , मृतांचे वडील गोपाळ बनसोडे तसेच आई शरणव्वा    बनसोडे यांची भेट घेऊन , त्यांचे सांत्वन केले .

यावेळी एका ग्रामस्थांशी संवाद साधून माहिती घेतल्यानंतर  , माध्यमांशी बोलताना अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी  यांनी सांगितले कि , बनसोडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे .  कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे .  जिल्हाप्रशासन आणि तालुका प्रशासनाने शोध मोहीम राबवली . आपण तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी बातचीत केली आहे .  ”

या वेळी , अथणीचे डीवायएसपी  व्ही गिरीश , सीपीआय शंकरगौडा बसनगौडर ,  समाज कल्याण विभागही अधिकारी प्रवीण पाटील आणि हल्याळ ग्रामस्थ उपस्थित होते .

 

Tags: