इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवून देण्याचे सांगून खोटी कागदपत्रे बनवून वाहने इतराना विक्री करणाऱ्या दोघांना चिकोडी पोलिसांनी अटक केली आहे .
चिकोडीच्या डीवायएसपी कार्यालयात आयोजित केलेली पत्रकार परिषदेत माहिती देताना एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी सांगितले कि , सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मच्छेन्द्रगड गावातील युनूस सैयद तसेच दांडेली शहरातील अफझल दिलावर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे . अटकेतील आरोपींकडून , टाटा कंपन्यांचे ४ टिप्पर , महिंद्रा कंपनीचे २ टिप्पर , अशोक लेलँड कंपनीची ३ वाहने ,एक जेसीबी अशी ३.६० कोटी रुपये किंमतीची बारा वाहने जप्त करण्यात आली आहेत . डीवायएसपी मनोजकुमार नाईक , सीपीआय आर आर पाटील , पी एस आय राकेश बगली ,अशोक कुल्लूर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी या बदमाशांना अटक केली आहे अशी माहिती एस पी लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली .
Recent Comments