डॉक्टर्स डे निमित्त बेळगावातील वडगाव येथे डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.

डॉक्टर्स म्हणजे देवच. एरव्ही आणि खासकरून कोरोना सारख्या संकटाच्या काळात रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करता डॉक्टरांनी अविरत श्रम घेतले. त्यांना आशा, आरोग्य कार्यकर्त्यांनीही साथ दिली. त्यांच्या कार्याची दखल म्हणून वडगावात डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. गुरुराज करीगौडर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला ,
सत्कार स्वीकारून बोलताना डॉ. एस. एम. दोडमनी म्हणाले, रुग्णांचा जीव वाचवणे हेच आमचे आध्य कर्तव्य समजून आम्ही कोरोनाकाळात रुग्णसेवा केली. अशावेळी लोकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. आता तिसऱ्या लाटेची भीती आहे. लोकांनी मास्क वापरून सामाजिक अंतर पाळून खबरदारी घेतली पाहिजे.
यावेळी डॉ. संतोष डोनी, डॉ. विजय बुगडे, डॉ. यु. के. गावकर, डॉ. कमकारट्टी, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. व्ही. के. कोळवेकर, आशा कार्यकर्त्या सुरेखा पवार, मुक्त बेलर, कविता पवार, समाजसेवक मनोहर शिरोडकर आदी उपस्थित होते.


Recent Comments